'युनिसेफ'ची गुडविल अॅम्बॅसिडर असलेल्या प्रियांका चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून जगभरातील नेत्यांनी युक्रेनसह पूर्व युरोपमधील निर्वासित आणि लहान मुलांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
दुसर्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने बालकांना आपले घर सोडून अन्यत्र आसरा शोधावा लागत असल्याचेही तिने सांगितले. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा 'रिफ्यूजी क्रायसिस' असल्याचेही तिने म्हटले. युक्रेन आणि जगभरातील विस्थापित लोकांच्या मदतीसाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आवाहन तिने जगभरातील नेत्यांना केले. ती म्हणाली, वीस लाख मुलांना आपल्या शेजारच्या देशांमध्ये आसरा शोधण्याची वेळ आली आहे. 25 लाख मुलं युक्रेनमध्येच आपले घर व गाव सोडून अन्य सुरक्षितस्थळी गेली आहेत. या शरणार्थींसाठी जगाने उभे राहिले पाहिजे.