

स्टार किडस्ना नेहमीच नेपोटिझमचा सामना करावा लागतो. मात्र आजही बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार किडस् आहेत, जे मेहनतीच्या जोरावर स्ट्रगल करताना दिसत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे, जेमी लिव्हर. जेमी प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी आहे. जेमी लिव्हर मार्केट रिसर्च एजन्सीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पण जेमीला काहीतरी मोठे करायचे होते. त्यानंतर जेमीने स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम करायला सुरुवात केली. जेमी बॉलीवूड स्टार्सची मिमिक्रीही करते. सोशल मीडियावर तिच्या मिमिक्रीचे अनेक व्हिडीओत आहेत. लोकांना जेमीची कॉमेडी, अभिनय आणि मिमिक्री खूप आवडते. जेमी खूप प्रतिभावान आहे, परंतु तरीही तिला अद्याप बॉलीवूडमध्ये अद्याप म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही. 12 वर्षांनंतरही जेमी ठसा उमटवण्यासाठी धडपडत आहेत. ती स्वबळावर पुढे जात आहे, असे जेमीने एका मुलाखतीत सांगितलं होते. दरम्यान, आता 'पॉप कौन' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधून जेमी झळकणार आहे.