द केरल स्टोरी : दहशतवाद्याची भूमिका साकारणारा अभिनेता विजय कृष्णा म्हणतो…

vijay krishna
vijay krishna
Published on
Updated on

देशभरात वाद सुरू असतानाही 'द केरला स्टोरी' चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा जादुई आकडा गाठण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. आता चित्रपटात इसिसच्या दहशतवाद्याची भूमिका साकारणारा अभिनेता विजय कृष्णाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, 'द केरला स्टोरी' चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी तशा घटना खर्‍याच घडल्याचे सांगण्यासाठी मेसेज आले. चित्रपटात मी इर्शाकची भूमिका साकारली आहे. त्याच्या वयोगटातील असंख्य तरुणांप्रमाणे तो सुद्धा मार्ग भटकला आहे. तो ख्रिश्चन असतो, मात्र इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तो इसिसचा या दहशतवादी संघटनेत सामील होतो. आपल्या आयुष्याचा मूळ हेतू सापडल्यासारखे त्याला वाटू लागते. केरळमधील अनेक लोकांनी मला मेसेज केले आहेत. हे आमच्यासोबत किंवा आमच्या ओळखीच्या लोकांसोबत खरेच घडले जाते काय? असे ते विचारत होते. मला त्यांच्यावर विश्वास आहे. एक किंवा दोन व्यक्तींसोबत जरी असे घडलं असेल तरी त्याबद्दल चर्चा झालीच पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news