lady gaga
lady gaga

‘जोकर’च्या सिक्वेलमध्ये लेडी गागा बनणार हार्ले क्वीन

Published on

चित्रपटातील काही कॅरेक्टर्स ही जगावर छाप सोडून जात असतात. असेच एक कॅरेक्टर म्हणजे 'बॅटमॅन' फ्रँचायजीतील जोकर. अलीकडच्या काळात 'जोकर'ची हवा निर्माण झाली ती ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'द डार्क नाईट'या चित्रपटात हीथ लीजर या अभिनेत्याने साकारलेल्या 'जोकर' या कॅरेक्टरमुळे. त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव स्टुडिओला 'जोकर' नावाचा स्वतंत्र चित्रपट बनवावा लागला. त्यातील भूमिकेसाठी जोआकिन फीनिक्सला ऑस्करही मिळाले आणि आता त्याच 'जोकर'चा सिक्वेल येत आहे. 'जोकर : फोली ए ड्यूक्स' असे या सिक्वेलचे नाव आहे. यात जोआकिन फीनिक्स सोबत हार्ले क्वीनच्या भूमिकेत हॉलीवूडची गायिका आणि अभिनेत्री लेडी गागा दिसणार आहे. चित्रपटाचा टीझर सोशल मीडियात शेअर करत गागाने ही माहिती दिली आहे. जोकरप्रमाणेच हार्ले क्वीन हे कॅरेक्टरही लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्या या घोषणेनंतर नेटवर चांगल्या-वाईट प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये हा चित्रपट रीलिज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news