जेम्स कॅमरून यांचा ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ भेटीस

जेम्स कॅमरून यांचा ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ भेटीस
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : 2009 साली सर्वाधिक कमाईचा इतिहास केलेल्या जेम्स कॅमरून यांच्या 'अवतार'चा दुसरा भाग आज तब्बल 12 वर्षांनी 'अवतार : द वे ऑफ वॉटर' नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

सली परिवाराच्या आयुष्यात येणार्‍या अडचणी आणि इतरही बर्‍याच गोष्टींचा उलगडा या नवीन भागातून होणार आहे, असे ट्रेलरमधून दिसत आहे. या अडचणींवर सली कुटुंब कशापद्धतीने मात करतेय, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. 'अवतार'चे आणखी तीन भाग येणार असून तिसरा भाग 'अवतार : द सिड बेअरेर' हा 2024 मध्ये प्रदर्शित होणार असून पुढचे दोन भाग 2026 आणि 2028 या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news