

अनुष्का शर्मा जवळजवळ साडेतीन वर्षांनंतर 'चकदा एक्स्प्रेस'मधून पुनरागमन करीत आहे. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या या बायोपिकसाठी ती बरीच मेहनतही घेत आहे. या चित्रपटाचे पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये शूटिंग सुरू होणार आहे.
शूटिंगसाठी अनुष्काने फ्रेबुवारीपासून तयारी सुरू केली होती. सध्या या चित्रपटाचे मुंबईतच एक शेड्युल सुरू आहे. अनुष्काने एका मुलाखतीत सांगितले होते की, अशा प्रकारच्या चित्रपटासाठी सर्व डिपार्टमेंटमध्ये चांगली तयारी होणे आवश्यक असते. त्याप्रमाणे सर्व काही झाले आहे. चित्रपटाची पटकथाही शानदार आहे व तिचा प्रेक्षकांवर प्रभाव पडेल.
मुंबईतील शूटिंगनंतर इंग्लंडमध्ये शूटिंग होईल. या चित्रपटाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा माझ्या पहिल्याच चित्रपटाचे शूटिंग करीत असल्यासारखे वाटत आहे, असेही तिने म्हटले आहे. प्रोसित जोशी दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.