

क्रीती सेनन हिचा 'मिमी' हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सन 2011 मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या आणि समृद्धी पोरे दिग्दर्शित 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित आहे.
दिनेश विजानच्या मॅडॉकॉक फिल्मसने जिओ स्टुडिओच्या मदतीने हिंदी रिमेकची निर्मिती केली आहे. 'मिमी'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मनोज पाहवा, सुप्रिया पाठक आणि सई ताम्हणकरसुद्धा आहेत. हा चित्रपट गतवर्षी थिएटरमध्ये प्रदशित होणार होता, मात्र, कोरोना साथीमुळे विलंब झाल्याने निर्मात्यांनी प्रदर्शनासाठी ओटीटीचा पर्याय निवडला. नेटफ्लिक्स इंडियाच्या ट्विटर हँडलनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची बातमी शेअर केली आहे.