पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलीवूडमध्ये अफवांचे पीक बेसुमार येते व त्याला अंतही नाही. हृतिक रोशनचा सुपरहीरो सीरिजवर आधारित 'क्रिश-4' हा नवा चित्रपट पुढील वर्षी येऊ शकतो, अशी एक अफवा अलीकडेच पसरली होती. मात्र, खुद्द निर्माते-दिग्दर्शक आणि हृतिकचे तीर्थरूप राकेश रोशन यांनीच या अफवेचे खंडन केले आहे. 'क्रिश-4' बाबतच्या सर्व बातम्या चुकीच्या असून याबाबत कोणत्याही स्वरूपाच्या कामाची सुरुवातही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही यावर काही विचार करू तेव्हाच सर्व काही तयार होईल, असे त्यांनी म्हटले आहे. पटकथा लेखिका हनी इराणी यांनीही या चित्रपटाबाबत कोणतेही काम सुरू झालेले नसल्याचे सांगितले. तरीही अशा बातम्या कशा येतात हेच समजत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे!