‘केजीएफ 2’विरोधात आमीर नाही, आता शाहिद!

‘केजीएफ 2’विरोधात आमीर नाही, आता शाहिद!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

आमीर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'लालसिंग चढ्ढा'ची रीलिज डेट आता पुन्हा लांबली आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. त्याच दिवशी कन्‍नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित 'केजीएफ चॅप्टर 2'देखील येणार आहे; पण आता आमीरने यशच्या चित्रपटाशी टक्‍कर टाळली आहे. आता 'लालसिंग चढ्ढा' 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॉम हँक्स अभिनीत हॉलीवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'फॉरोस्ट गम्प'चा हा रीमेक आहे. आमीरने सोशल मीडियात शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चित्रपट अद्याप पूर्ण होऊ न शकल्याने आम्हाला विलंब होत आहे. त्यामुळेच नियोजित तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. आम्ही 'आदिपुरुष' चित्रपटाच्या टीमचेही आभार मानतो, त्यांनी आमच्यासाठी त्यांची रीलिज डेट पुढे ढकलली आहे.

'आदिपुरुष' 11 ऑगस्टला रीलिज होणार होता. दरम्यान, शाहिद कपूरचा 'जर्सी' 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 14 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर 'केजीएफ चॅप्टर 2' आणि 'जर्सी' आमने-सामने असतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news