किती क्यूट आहे सोनमचा लाडका वायू!

किती क्यूट आहे सोनमचा लाडका वायू!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सोनम कपूर आणि आनंद आहुजाला 20 ऑगस्टला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांच्या लाडक्या लेकाचा नामकरण सोहळाही काही दिवसांपूर्वीच पार पडला. सोनम आणि आनंदने त्यांच्या बाळाचे नाव 'वायू' असे नाव ठेवले आहे. आता वायूच्या रूमचे फोटोही समोर आले आहेत.

वायूसाठी सजवलेल्या रूमचे फोटो शेअर करत त्यांनी 'वायू कपूर-आहुजाची रूम. किती क्यूट,' असे कॅप्शन महीप कपूरने दिले आहे. फोटोमध्ये वायूच्या रूमचा दरवाजा बाहुल्यांनी सजवलेला दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आनंद आहुजाने काही दिवसांपूर्वी सोनम कपूर आणि वायूबरोबरचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर चाहते कमेंट करून सोनम आणि आनंदला शुभेच्छा देत आहेत. आनंद आहुजाने लाडक्या लेकासाठी केलेल्या खरेदीचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला
होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news