

दोन मुलांची आई बनलेल्या करिनाचा 'करिश्मा' अजूनही कमी झालेला नाही. तिचे चाहतेच नव्हे तर ती स्वतःही आमीर खानसमवेतच्या 'लालसिंह चढ्ढा' या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की या चित्रपटाचा ट्रेलर 'आयपीएल'च्या समारोप समारंभात लाँच केला जाऊ शकतो. आमीर खान आणि निर्माते या ट्रेलरला लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 29 मे रोजी एका भव्य समारंभात हा ट्रेलर लाँच केला जाईल, असे म्हटले जात आहे. तसे झाले तर एखाद्या क्रिकेट समारंभात चित्रपटाचा ट्रेलर लाँच होण्याची ही पहिलीच वेळ असेल. हा चित्रपट 1994 मधील 'फॉरेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक असून त्यामध्ये आमीर व करिनासमवेत नागा चैतन्य आणि मोना सिंह प्रमुख भूमिकेत आहेत.