कमल हासन याच्या ‘इंडियन – २’ चे शूटिंग सुरू

Kamal Haasan
Kamal Haasan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी त्यांच्या 'इंडियन' या हिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण चेन्नईत सुरू केले. दिग्दर्शक शंकरने सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. हे शेड्यूल ३० दिवस चालेल. कारण, कमल आणि शंकर यांनी अनुक्रमे 'बिग बॉस' तामीळ आणि 'आरसी – १५' साठीच्या त्यांच्या मागील कमिटमेंट पूर्ण केल्या आहेत.

कमल आणि त्यांची टीम पुढील ३० दिवस चेन्नईच्या आदित्यराम स्टुडिओमध्ये शूटिंग करणार आहे. निर्माते विदेशातही एक किंवा दोन शेड्यूलचा विचार करत आहेत. 'इंडियन-२'चे शूटिंग २०१९ मध्ये सुरू झाले होते; मात्र सेटवर एक अपघात झाला होता. त्यानंतर शूटिंग पुढे ढकलले होते. काजल अग्रवाल, बॉबी सिम्हा आणि सिद्धार्थदेखील यात दिसणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news