आत्महत्या करणार होती मृणाल ठाकूर

 मृणाल ठाकूर
मृणाल ठाकूर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतेच तिच्या एका मुलाखतीत तिच्या स्ट्रगलबाबत बातचीत केली. यात तिने ती आत्महत्या करणार होती, असा खुलासाही केला आहे. तिच्या पालकांना तिने डेंटिस्ट बनावे, असे वाटत होते. पण मृणालला टीव्हीवर येण्यासाठी क्राईम रिपोर्टिंग करायचे होते. आणि त्यासाठी पालकांना मनवण्यात तिला खूप प्रयत्न करावे लागले. यशस्वी होण्याची एक मोठी जबाबदारी माझ्यावर होती. पत्रकारिता सोपी नाही. मी 17 वर्षांची असताना मुंबईत एकटी राहत होते. 23 व्या वर्षी लग्‍न करून मुले जन्माला घालायची, असे मला कधीही वाटले नाही. मी ऑडिशन देऊ लागले. तेव्हा मी लोकल ट्रेनने प्रवास करत होते. रिजेक्शननंतर अनेकदा रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करावीसी वाटली होती, असे मृणालने स्पष्ट केले. दरम्यान, आगामी काळात मृणाल 'जर्सी', 'पिप्पा', 'आँख मिचौली' आणि 'थडम' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news