आता खूप झाले!…, जया बच्चन भडकल्या,

Jaya Bachchan
Jaya Bachchan

पुढारी ऑनलाईन : चित्रपट निमति (कै.) यश चोप्रा यांच्या पत्नी आणि आदित्य चोप्रा यांची आई पामेला चोप्रा यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. अनेक बॉलीवूड कलाकार चोप्रा यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी भेट देत आहेत. जया बच्चन यांनी चोप्रा यांच्या निवासस्थानी भेट देत दुःख व्यक्त केले.

जया बच्चन यांच्याबरोबर त्यांची मुलगी घेता श्वेता बच्चनही होती. या दोघी चोप्रा यांच्या निवासस्थानाकडे जात असताना काही फोटोग्राफर्स त्याचे फोटो क्लिक करत होते. त्यामुळे जया बच्चन भडकल्या आणि त्यांनी पापाराझीना लांब उभे राहण्यास सांगितले. आमचे फोटो काढू नका, आता खूप झाले, परत जा, असे त्यांनी फोटोग्राफर्सना सांगितले, सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news