‘अवतार-2’ची कमाई 1,85,92,44,37,600 रुपये

अवतार 2
अवतार 2
Published on
Updated on

'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रीलिजच्या पहिल्या दिवसापासून कमाईचा विक्रम करणार्‍या या सिनेमाने आता आणखी एक विक्रम केला आहे. या सिनेमाने आता 'टायटॅनिक' या सुपरहिट चित्रपटाचाही विक्रम मोडला आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.2448 बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चलनानुसार या सिनेमाने 1,85,92,44, 37,600 रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'टायटॅनिक' हा सिनेमा 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही जेम्स कॅमरॉन यांनी केले होते. या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 'अवतार', 'अवतार-2' आणि 'टायटॅनिक' या सिनेमांचा समावेश जगभरातील सर्वाधिक कमाई करणार्‍या सिनेमांच्या यादीत होतो. महत्त्वाची बाब म्हणजे, जेम्स कॅमरॉन यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news