अमिताभ बच्चन यांचे अँलन मस्कसाठी भन्नाट गाणं

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन : ट्टिटरने नावापुढील ब्ल्यू टिक हटविल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी अस्सल इलाहबादी भाषेत ट्टिट करत ब्ल्यू टिक पुन्हा लावण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर अमिताभ यांना ब्ल्यू टिक मिळाली.

ब्ल्यू टिक मिळाल्यानंतर अमिताभ यांनी पुन्हा एकदा मिष्किल शैलीत तीन ट्टिट केले आहेत. अमिताभ बच्चन यांचे हे ट्टिट चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन यांनी रात्री एक वाजता हे ट्टिट केले आहेत. त्यात ते म्हणतात, ए मस्क भैया, मी तुला खूप खूप धन्यवाद देत आहे. तू माझ्या नावाच्या पुढे ब्ल्यू टिक लावली आहेस. आता तुला काय सांगू? एक गाणं गुणगुणावसं वाटतंय. ऐकतोयस ना? मग ऐक तू. चीज बड़ी है मस्क मस्क… चीज कड़ी है मस्क मस्क… असे गंमतीशीर ट्रिट अमिताभ यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news