![अजय देवगणचा आता सिंघम 3](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F09%2Fajay-devgan.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : अजय देवगणचा द़ृश्यम – 2 या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सध्या चांगली कामगिरी करत आहे. सात दिवसांमध्ये या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. आता द़ृश्यम – 2 नंतर अजयचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची शूटिंग अजयने सुरू केले आहे.
भोलानंतर अजयचा एक बहुचर्चित सिंघम – 3 हा चित्रपट देखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. भोलाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर लगेचच अजय हा सिंघम चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे.
सिंघम 3 चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एका रोहित शेट्टी आणि अजय सोबत काम करणार आहेत. सिंघम चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचे प्रतिसाद चांगला मिळाला. आता सिंघम – 3 काय धमाका करतो, हे काळच ठरवेल.