अँजेलिनावर ब्रॅडचा फसवणुकीचा आरोप

अँजेलिनावर ब्रॅडचा फसवणुकीचा आरोप
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली ही जोडी एकेकाळी हॉलीवूडमधील सर्वात हॉट कपल मानले जात होते. दोघांनी डेटिंगनंतर 2011 मध्ये लग्‍न केले होते आणि त्यानंतर पाच वर्षांनी 2016 मध्ये दोघांचा घटस्फोटही झाला. त्यानंतर त्यांच्यात बराच कटुपणा आला आहे. सातत्याने दोघांत कोर्टाच्या फेर्‍या होत असतात. दोघांना मुलांची जॉईंट कस्टडी मिळाली आहे. त्यात आता ब्रॅडने अँजेलिनावर फसवणुकीचा आरोप करत तिच्याविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. दोघे एकत्र असताना दोघांनी एक घर आणि एक वायनरी खरेदी केली होती.

एकमेकांच्या सहमतीनंतरच स्वतःच्या हिश्श्याची विक्री केली जाईल, असे दोघांत ठरले होते; पण अँजेलिनाने ब्रॅडला न विचारताच गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये तिचा हिस्सा विकून टाकला. त्यामुळे ब्रॅडने तिच्यावर फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा दोघांच्या कोर्टाच्या फेर्‍या वाढणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news