Zubeen Garg Movie: लाडक्या गायकाचा शेवटचा सिनेमा पाहून ढसाढसा रडले जुबिन गर्गचे फॅन्स; व्हीडियो होत आहेत व्हायरल

आसामातील लोकांसाठी जुबिन गर्ग केवळ गायक किंवा अभिनेता नाहीत तर एक भावना आहेत
Entertainment
ढसाढसा रडले जुबिन गर्गचे फॅन्सPudhari
Published on
Updated on

लोकप्रिय आसामी गायक जुबिन गर्ग यांचे अलीकडेच दुर्दैवी निधन झाले. पण त्यांचा शेवटचा सिनेमा ' 'रोई रोई बिनाले' नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला आसामीज प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आसामातील लोकांसाठी जुबिन गर्ग केवळ गायक किंवा अभिनेता नाहीत तर एक भावना आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर शेवटचा सिनेमा रोई रोई बिनाले जवळपास दिढ महिन्यांनी रिलीज होतो आहे. यामुळे जुबिनच्या फॅन्सच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. (Latest Entertainment News)

यावेळी अनेक फोटो व्हीडियो समोर येत आहेत. ज्यामध्ये जुबिनचे फॅन्स धाय मोकलून रडताना दिसत आहेत. तर अनेक थिएटरबाहेर प्रेक्षकांच्या रांगा दिसत आहेत.

90 वर्षांची महिला पोहोचली सिनेमा पाहायला

आसाममध्ये या सिनेमाचा पहिला शो सकाळी 5 वाजता सुरू झाला. अनेकजण हा सिनेमा पाहून झाल्यानंतर साश्रू नयनांनी थिएटर सोडताना दिसत आहेत. या प्रेक्षकांच्यामध्ये 90 वर्षांची एक आजीही होत्या. विशेष म्हणजे चालण्यासाठी अक्षम असलेल्या या आजीना आणखी एकाने उचलून नेऊन थिएटरमध्ये नेले.

जुबीनचा ड्रीम प्रोजेक्ट होता 'रोई रोई बिनाले'

या सिनेमासाठी जुबीन जवळपास 19 वर्षे मेहनत घेत होते. त्यांचा मृत्यूच्या काहीच दिवस आधीच हा सिनेमा बनवून पूर्ण झाला होता. हा सिनेमा रिलीज होताच भर पावसातही सकाळी चारपासून चाहत्यांनी थिएटरवर हजेरी लावली होती. या सिनेमाचे एक आठवड्यापर्यंतचे अॅडव्हान्स बुकिंग झाले असल्याचेही समोर येत आहे.

जुबीनच्या इच्छेनुसार विशिष्ट तारखेलाच हा सिनेमा केला रिलीज

हा सिनेमा 31 ऑक्टोबरला रिलीज केला जावा ही जुबिन यांची इच्छा होती. या सिनेमाची पटकथा जुबिन यांनी लिहिली आहे. या सिनेमाचे संगीतही त्यांनी केले आहे.

रोई रोई बिनाले विषयी..

या सिनेमाचे दिग्दर्शन राजेश भूयन याने केले आहे. या सिनेमात जुबीन गर्ग यांची मुख्य भूमिका होती. याशिवाय या सिनेमात जॉय कश्यप, अचुरिया बोरपात्रा, मौसमी अलैफ़ा, यशश्री भुयन, कौशिक भारद्वाज हे कलाकारही आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news