पुढारी ऑनलाईन डेस्क - काही संघर्ष इतके शांतपणे लढले जातात की, त्यांच्याबाबत काही समजत देखील नाही. आपण अनेकदा सामना करणाऱ्या अंतर्गत संघर्षाकडे दुर्लक्ष केले जाते, तरीही ते आपल्या जीवनाला अशाप्रकारे आकार देतात की, आपण त्यांना व्यक्त करू शकत नाही. सोनी लिव्हवरील आगामी सिरीज 'Zindagi नामा' जीवनप्रवासाला सादर करते. ज्यामध्ये ६ अद्वितीय कथांच्या माध्यमातून जीवनातील अनेक आव्हानांना दाखवण्यात आले आहे. या कथा आहेत भंवर, स्वागतम, वन+वन, केज्ड, पपेट शो आणि पर्पल दुनिया. हे कथासंग्रह मानसिक आजारासह जगणाऱ्या व्यक्तींच्या भावनिक स्थितीला सादर करते. प्रत्येक कथेमधून रोमांचक अनुभव मिळतो, जो तुमचे लक्ष वेधून घेईल आणि त्या संघर्षांचा सामना करण्यासोबत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याचा उलगडा करेल.
या सिरीजमध्ये श्वेता बासू प्रसाद, प्रिया बापट, प्राजक्ता कोळी, यशस्विनी दयामा, लिलेट दुबे, श्रेयस तळपदे, अंजली पाटील, सुमीत व्यास, इवांका दास, मोहम्मद समद, शिवानी रघुवंशी, सयनदीप सेनगुप्ता, तन्मय धनानिया आणि श्रुती सेठ. आदित्य सरपोतदार, सुकृती त्यागी, मिताक्षरा कुमार, डॅनी मामिक, राखी संदिया असे प्रतिभावान कलाकार आहेत. सहान यांचे दिग्दर्शन असलेली ही सिरीज वैयक्तिक जीवनप्रवासाला सादर करते. तसेच पात्रांना सामना कराव्या लागणाऱ्या संघर्षांसोबत त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेला देखील दाखवते.
ही सीरीज १० ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर पाहता येईल.