

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान चित्रीकरणाच्या सेटवर असताना एका अज्ञात तरूणाने चित्रीकरणाच्या सेटवर अचानक प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविले असता मी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला सांगू का ? असं म्हणाला. या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. (Salman Khan News)
'काळवीट' प्रकरण सलमानला चांगलेचं भोवलं असून याप्रकरणी सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. एप्रिलमध्ये त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. त्यानंतर सलमान खानला जिवंत रहायचं असल्यास त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, अन्यथा ५ कोटी रुपये द्यावे, अशा धमकीचा मँसेज काही दिवसांपूर्वी मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला होता. आपण लारेन्स बिष्णोईचा भाऊ असल्याचा उल्लेख मँसेजमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर सलमानला धमक्यांच्या मँसेजचे सत्र सुरूच होते. (Salman Khan News)