पुढारी ऑनलाईन डेस्क : देव पटेल, फ्रीडा पिंटो प्रमुख भुमिकेत असणारा सुपरहिट चित्रपट 'स्लमडॉग मिलेनियर' चा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. उत्तम कथानक असणा-या या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्सच्या माजी कार्यकारी स्वाती शेट्टी आणि माजी CAA एजंट ग्रँट केसमन यांची निर्मिती कंपनी ब्रिज 7 ने घेतले आहेत.
2008 मध्ये ऑस्कर-विजेत्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सेलेडोरकडून या चित्रपटाची शीर्षके घेतली गेली आहेत. या चित्रपटाला 81 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये 8 पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटाने 7 बाफ्टा पुरस्कारही जिंकले आहेत.
स्लमडॉग मिलेनियर हा चित्रपट विकास स्वरूप यांच्या प्रश्नोत्तरांच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॅनी बॉयल यांनी केले आहे. या चित्रपटाचे कथानक खू्पच छान आहे. स्लमडॉग मिलेनियर ही एक जमालची कथा आहे, चित्रपटात मुंबईतील झोपडपट्टीतील खडतर जीवन चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या प्रमुख भुमिकेत अभिनेता देव पटेल तर अभिनेत्री फ्रीडा पिंटो यांनी काम केले आहे. झोपडपट्टीतील खडतर जीवनाला त्रासलेला मुलगा करोडपती होण्याचा क्विझ शो जिंकतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे.
चित्रपटाच्या सिक्वेल निर्मिती विषयी स्वाती शेट्टी आणि ग्रँट केसमन म्हणाल्या, मनोरंजनाला खोल मानवी अनुभवांशी जोडणारी ही कथा आहे. आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल नव्याने स्थापन झालेल्या कंपनीला सुरू करण्यासाठी निवडला याचा मला आनंद आहे.
चित्रपटाच्या पहिल्या भागात देव पटेल, फ्रीडा पिंटो,अनिल कपूर यांच्या भुमिका होत्या. आता हे स्टार्स सिक्वेलमध्ये दिसणार की नाही आणि या चित्रपटाचा सिक्वेल होणार आहे की नाही, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नसून अध्याप गुलदस्त्यातच आहे.