

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'पुष्पा २ द रूल' चित्रपटाचे सहाव्या दिवसाची कमाईची आकडेवारी समोर आली आहे. पुष्पा २ ने मागील ५ दिवसांत वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर ९०० कोटींचा बिझनेस केला आहे. पुष्पा २ ने पहिल्या सोमवारी ६० कोटींहून अधिक बिझनेस केला आहे. भारतात ५०० कोटी रुपयांचा आकडा पार करणारी पुष्पा २ आता वर्ल्डवाईड १००० कोटीच्या दिशेने जात आहे. लवकरच अल्लू अर्जुनचा चित्रपट १ हजार कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करायला तयार आहे.
पुष्पा २ वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटी रुपये कमावणारा ८ वा चित्रपट बनला आहे. पुष्पा २ ने बॉक्स ऑफिसवर आज ६०० कोटींचा आकडा पार केला आहे.
पुष्पा २ मागील ५ डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. पुष्पा-२ ने बॉक्स ऑफिसवर १७० कोटी रुपयांचा आणि वर्ल्डवाईड २९४ कोटी रुपये मिळवून खाते उघडले होते. इंडियन बॉक्स ऑफिस आणि वर्ल्डवाईड सर्वात मोठी ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला आहे. हिंदीमध्ये पहिल्या दिवशी ७२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५९ कोटी, तिसऱ्या दिवशी ७४ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ८६ कोटी रुपयांची कमाई केली होती. पाचव्या दिवशी ४६ कोटी असे मिळून बॉक्स ऑफिसवर ५९३ कोटी आणि वर्ल्डवाईड ८२९ कोटी रुपये कमावले.