

पुढारी ऑनलाईन डेस्क - पुष्पा-२ : द रुल ने १७ व्या दिवशी १०२९.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने ५ डिसेंबर रोजी १००० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली. 'बाहुबली २' नंतर १००० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणारा दुसरा चित्रपट बनला आहे. 'लाल चंदनाची तस्करी' हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे. लाल चंदनासाठी संघर्ष करण्याइतपत एवढं काय आहे रक्तचंदनमध्ये? त्याची इतकी किंमत का आहे? या रक्तचंदनासाठी एवढा रक्तपात का होतोय?
लाल चंदनाचं शास्त्रीय नाव 'टेरोकार्पस सँटालिनस' असं आहे. सामान्यपणे रेड सँडर्स , रेड सॉन्डर्स, येरा चंदनम , चेनचंदनम, रेड सँडलवूड, रक्तचंदन आणि रक्तचंदन नावाने ओळखले जाते. टेरोकार्पस एक प्रजाती आहे जी दक्षिण भारताच्या पूर्व घाट पर्वतराजीत उगवते. ते तामिळनाडूच्या सीमेवर आणि आंध्र प्रदेशच्या हद्दीत असणाऱ्या जंगलात आढळते. जंगलाचं नाव 'शेषाचलम' असं आहे. आंध्र प्रदेशातल चित्तूर, नेल्लोर, कुरनूल, कडप्पाड या या जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत रक्तचंदनाचे जंगल पसरले आहे. विशाल क्षेत्रामध्ये हे जंगल पसरले असून गर्द झाडीमध्ये ११ मीटरपर्यंत ही झाडे उंच वाढतात.
अलिशान घरे, राजवाडे यांचे फर्निचर तयार करण्यासाठी, सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी, चीन, जपान आणि इतरही देशांमध्ये लाल चंदनाला मागणी आहे. पुजेचं साहित्य बनविण्यासाठी लाल चंदनाची मागणी परदेशातून अधिक असते. चीनमधून त्याची प्रचंड मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत खूप असल्यामुळे हे चंदन मौल्यवान आहे. (Pushpa Movie)
लाल चंदनाचा उपयोग पूल बनवण्यासाठी आणि जपानी संगीत वाद्ययंत्र शमीसेनमध्येही वापरले जाते.
टेरोकार्पस सँटालिनसचा उपयोग पारंपरिक हर्बल चिकित्सामध्ये ज्वरनाशक, सूजरोधी, कृमिनाशक, टॉनिक, रक्तस्राव थांबवण्यासाठी उपयोग केला जातो. आयुर्वेदात लाल चंदनाचा उपयोग नेत्र विकारातील उपचारासाठी केलं जातं.