Why didn't Deepika pursue badminton career?|'दीपिकाला कधीच बॅडमिंटनसाठी सक्ती केली नाही, तिचं पहिलं प्रेम..' प्रकाश पदुकोण काय म्हणाले?

'दीपिकाला कधीच बॅडमिंटनसाठी सक्ती केली नाही..तिचं पहिलं प्रेम..' प्रकाश पदुकोण यांनी केला मोठा खुलासा
deepika padukone
Prakash Padukone revealed about deepika's career pudhari photo
Published on
Updated on
Summary

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे वडील आणि दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी तिच्या करिअर निवडीबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. दीपिकावर कधीही बॅडमिंटन खेळण्यासाठी दबाव टाकला नाही.

Why didn't Deepika pursue a career in badminton?

माजी बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पदुकोण यांनी आपल्या दोन्ही मुलींबद्दल, त्यांच्या संगोपनाबद्दल आणि करिअरबद्दल एका मुलाखतीत बातचीत केली. प्रकाश पदुकोण यांना दीपिका पदुकोण आणि अनिशा पदुकोण अशा दोन मुली आहेत. दीपिका आज टॉपची अभिनेत्री आहे. प्रकाश यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, कशाप्रकारे आपल्या मुलींना त्यांनी करिअर निवडण्यासाठी सूट दिली. आपल्या अपेक्षा कधीच त्यांनी त्यांच्या मुलांवर लादल्या नाहीत.

पालक म्हणून कसा विचार करतात प्रकाश पदुकोण?

प्रकाश म्हणाले, एखादी गोष्ट तुम्हाला आवडते आणि त्याबद्दल उत्कट आवड असणं यात फरक आहे. जर एखाद्या मुलाला खरोखरच संगीत, खेळ किंवा इतर कोणत्याही गोष्टीत आवड असेल, तर मुले त्यासाठी काहीही करायला तयार असतात, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मुले सतत त्यात रमत असतात. त्यासाठी तासनतास घालवतात, लवकर उठतात, रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. हे निरिक्षण पालकांनी केले पाहिजे. पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

deepika padukone
Maharashtra Epstein Files |'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' मधून 'कॅप्टन भोंदू बाबा'चा खरा चेहरा येणार समोर!

जर मुलांच्या मनासारख्या घडल्या गोष्टी नाहीत, तरी आजच्या तरुण पिढीला काही वर्षांतच समजते की, काय योग्य आहे, काय नाही. पण जर तुम्ही त्यांना कधीच संधी दिली नाही, तर काय साध्य करता आले असते हे पालकांना किंवा मुलाला कधीच कळणार नाही."

दीपिकाबाबत बोलताना प्रकाश पदुकोण म्हणाले, दीपिका किशोरवयीन असताना ती बॅडमिंटन खेळायची. पण तिचे मन नेहमीच मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये रमले होते. दीपिका जेव्हा बॅडमिंटन खेळत होती, तेव्ही ती दहावीत होती. तिने आम्हाला सांगितले की, तिला मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये करिअर करायचे आहे. आमच्या कुटुंबातील कोणाचीही फिल्मी बॅकग्राऊंड नव्हती. खेळ हे तिचे दुसरे प्रेम होते. तिचे पहिले प्रेम मात्र नेहमीच कॅमेऱ्यासमोर असणे हे होते. तिच्या आठवणी सांगताना ते म्हमाले, तिने मॉडेलिंगचे काही प्रोजेक्ट, जाहिराती, बॅले नृत्य आणि रॅम्प वॉक्स केले होते. त्यामुळे आम्हाला कल्पना होती की, तिला या क्षेत्रात आवड आहे.

''दीपिकाने आधी आपले शालेय शिक्षण पूर्ण करावे, अशी आमची इच्छा होती; परंतु लवकरच तिला संधी मिळत गेल्या. आम्ही तिला प्रोत्साहन दिले. तिथूनच सर्व गोष्टी जुळून आल्या. मॉडेलिंग आणि चित्रपट हेच तिचे खरे वेड आहे. बॅडमिंटनच खेळ असे आम्ही तिच्यावर कधीच सक्ती केली नाही."

deepika padukone
Pahlaj Nihalani : ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन

प्रकाश पदुकोण यांनी दीपिकाला दिला होता महत्त्वाचा सल्ला

"मी तिला तोच सल्ला दिला, जो माझ्या वडिलांनी मला दिला होता. मी तिला म्हणालो, 'चित्रपट आणि मॉडेलिंग क्षेत्राबद्दल मला काहीच माहिती नाही... तुझे करिअर तुला स्वतःच्याच बळावर घडवावे लागेल...आम्ही तिला घराबाहेर पडून प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले. जर त्यात यश मिळाले, तर उत्तमच. आणि जर यश मिळाले नाही तरीही किमान आपण केलेली मेहनत ही सर्वोत्तम होती, याची जाणीव तिला करून दिली."

अनीषा पदुकोणसाठीही तोच सल्ला

प्रकाश यांची धाकटी मुलगी आणि दीपिकाची लहान बहिण अनीषाबाबतीतही असाच प्रसंग घडल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, अनीषाला गोल्फमध्ये अधिक रस होता. तुला जे करायचे आहे ते कर; पण तुला स्वतःलाच ही जबाबदारी घ्यावी लागेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news