

Actor R Madhavan : पाठ्यपुस्तकांतील इतिहास यावर एका चर्चासत्रात मुघलांवर 8 धडे आणि वैभवशाली चोळ साम्राज्यावर केवळ एक धडा का ? असा सवाल अभिनेता आर माधवन याने एका चर्चासत्रात केला. NCERT च्या इयत्ता सातवीतील पुस्तकातील मुघल साम्राज्यावर असलेले धडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीच या सिलेबसमध्ये जैन, हिंदू आणि बौद्ध धर्माविषयी काहीच का समाविष्ट केले नाही याबाबतही त्याने विचारणा केली आहे.
यावर अधिक बोलताना तो म्हणतो, ‘ मी हे बोलून कदाचित अडचणीतही येऊ शकतो. पण हे बोलणं गरजेचे आहे. मी शाळेत इतिहासाचा अभ्यास केला तेव्हा मुघल साम्राज्यावर आठ धडे, हडप्पा- मोहेंजोदरो सभ्यतेवर एक धडा, भारतीय स्वातंत्र्यलढयावर चार धडे आणि चोळ, पांड्य, पल्लव आणि चेरा सारख्या दक्षिणी साम्राज्यावर केवळ एकच धडा त्या पुस्तकात असे. मुघल आणि ब्रिटिशांनी आपल्यावर 800 वर्ष राज्य केले. पण चोळ साम्राज्य हे 2400 वर्षे जूने आहे. तरीही त्याबाबत पुस्तकात केवळ एकच धडा? समुद्र सफर आणि नाविक दलाचा पाया त्यांनी घातला. त्यांचा मसल्याचा व्यापार रोमपर्यंत पसरलेला होता.
आमच्या बलशाली नाविक दलाच्या साह्याने आम्ही अनकोरवट येथील भव्य हिंदू मंदिरे उभारली याचा उल्लेख कुठे आहे आपल्या इतिहासात? जैन, हिंदू आणि बौद्ध धर्म चीनपर्यंत पसरलेले आहेत. कोरियन भाषेतील बरेचसे शब्द तामीळ भाषेतील शब्दांशी साधर्म्य दर्शवणारा आहे कारण आपली भाषा, संस्कृति तिथवर पोहोचली होती हे इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कुठेही लिहिलेले नाही.’
पुढे तो म्हणतो, शालेय पाठ्यपुस्तकात मुघल वंशाच्या इतिहासाचा प्रभाव आहे. याशिवाय त्याचे अनावश्यक उदात्तीकरणही केले गेले आहे. या धारणा कुणी ठरवल्या आहेत? हा अभ्यासक्रम कुणी ठरवला ? तमिळ ही जगातील अत्यंत प्राचीन भाषा आहे. पण याबाबत कुणालाही जास्त माहिती नाही. पुढे तो म्हणतो, ‘ केसरी चॅप्टर 2’ हे धारणा बदलण्याच्या दृष्टीने टाकलेले पाहिले पाऊल आहे. या धारणा बदलण्यासाठी ते प्रयत्न करत असतील. तर ते चांगलेच आहे.
NCERT मुघल आणि दिल्लीचे साम्राज्य याविषयीचे बहुतांश उल्लेख हटवले आहेत.भारतीय संस्कृती' दर्शवणाऱ्या राजवंशांवर आधारित प्रकरण, महाकुंभ आणि केंद्रीय सरकारच्या प्रमुख उपक्रमांवरील उल्लेख यांच्याशी संलग्न असे हे अभ्यासक्रम असल्याचे बोलले जात आहे.