Paresh Rawal: मान जाओ बाबूभैय्या! नेटीझन्स सोडेनात परेश रावल यांची पाठ; पाडला कमेंट्सचा पाऊस

Paresh Rawal and Herapheri 3 controvercy: परेश रावल सोशल मिडियावर कुठेही अॅक्टिव दिसोत चाहते त्यांना हेराफेरीमध्ये परत येण्याची गळ घालतात
Entertainment news
परेश रावल pudhari
Published on
Updated on

अभिनेता परेश रावल मागील काही दिवसांपासून हेराफेरी 3 मुळे चर्चेत आहेत. या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याने चाहते खुश होते पण अचानक परेश रावल या सिनेमातून बाहेर पडल्याने चाहत्यांची निराशा झाली. खरे तर अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या बॉंडिंगशिवाय हा सिनेमा अपूर्ण आहे. परेश रावल यांचा अचानक सिनेमा सोडण्याचा निर्णय निर्माता असलेल्या अक्षयला इतका खटकला की हे प्रकरण अगदी 25 कोटींच्या दाव्यापर्यंत पोहोचल. यानंतरही आरोप प्रतीआरोप बरेच झाले. दरम्यान परेश रावल यांनी वादामुळे सिनेमाचे साइनिंग अमाऊंटही परत केले आहे.

पण नेटीझन्स मात्र परेश रावल यांची पाठ सोडण्याचे मनावर अजिबात घेताना दिसत नाहीत. परेश रावल सोशल मिडियावर कुठेही अॅक्टिव दिसोत चाहते त्यांना हेराफेरीमध्ये परत येण्याची गळ घालतात.

आताही त्यांनी x वर एक पोस्ट केली. ज्याचे कॅप्शन होते. ‘Hey bhagwan ! NOOOOOO !!!’ यानंतर नेटीझन्स त्यांच्या ट्वीटचा संबंध अलीकडे घडलेल्या घटनांशी जोडू लागले. पण काही युजरने मात्र त्यांना हेराफेरी 3 साठी विचारणा केली. एक फॅन म्हणतो,  'तयार व्हा ना सर... ही जगराहाटी चालूच राहणार…’ तुमचे सिनेमे पाहून HP1 आणि HP2 पाहून हसून हसून बाकीचे सगळ विसरून जायला होत । तुम्ही मध्ये असाल अशी आशा आहे HP3 में हो... तुम्ही अनेकांना खळखळून हसवता .. सर..तुम्ही सगळ्यांच्या मनाचे संरक्षण करणारे खरे सैनिक आहात.’

तर दूसरा म्हणतो 'रुसवा सोडा ना बाबूभैय्या'. तर दूसरा म्हणतो मान जाओ ना मालिक, क्यों सबको रुला रहे हो।' तर एक युजर 'प्लीज बाबूभैय्या'

Pudhari

सोनाक्षी सिन्हा देखील युजरच्याच बाजूने

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणते परेश रावल यांच्याशिवाय हेराफेरी 3 ची कल्पनाच करू शकत नाही. परेश रावल यांचा सिनेमातील वावर सिनेमातील यश अधिक अधोरेखित करते.त्यामुळे ते सिनेमाचा पार्ट असावेत अशी माझी मनापासूनची इच्छा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news