1975 मध्ये भारतीय सिनेमात एक नवा इतिहास रचला गेला. रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम रचले. पाच दशकानंतरही शोलेचे भारतीय प्रेक्षकांवरील गारुड कायम आहे. या सिनेमाच्या लोकप्रियतेमुळेच हा सिनेमा री रिलीज होतो आहे. यावर्षी शोलेच्या रिलीजला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
अर्थात भारतीय सिनेमाप्रेमींसाठी यात काहीतरी एक्स्ट्रा आहे. हा सिनेमा त्याच्या अनकट व्हर्जनसह रिलीज होणार आहे.
फिल्म हेरिटेज फाउंडेशनने या गोष्टीची माहिती त्यांच्या ऑफिशियल instagram हँडलवर दिली आहे. इटलीतील बोलोग्रामध्ये होणाऱ्या Cinema Ritrovato या फेस्टिवल दरम्यान या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडणार आहे. जो शोले सिनेमा आपण इतके दिवस पहिला होता तो सेन्सॉर व्हर्जन होता. तर आता रिलीज होणाऱ्या सिनेमाचे अनकट व्हर्जन पाहता येणार आहे. 27 जूनला रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी पिजाया मैजियोरे मध्ये हा सिनेमा रिरिलीज होणार आहे.
शोले हा भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी सिनेमा मानला जातो. याशिवाय 1975 मध्ये सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा सिनेमा म्हणूनही त्याकडे पहिले जाते.
27 जूनला रिलीज होत असलेला शोले हा अनकट व्हर्जन रिलीज होतो आहे. अनकट व्हर्जन म्हणजे मूळ सिनेमा. यामध्ये शोलेचा मूळ एंडिंगचा समावेश असेल ज्यात ठाकूर गब्बरला मारतो असे दाखवले गेले होते. हा शेवट सीबीएफसीच्या सुचनेनंतर बदलला गेला होता
या सिनेमाच्या रिलीजवर अमिताभ बच्चन यांनी आनंद जाहीर केला आहे. ते म्हणतात आयुष्यात काही गोष्टी कायमस्वरूपी मनात राहून जातात. शोले सिनेमा त्यापैकी एक आहे. त्या सिनेमाचे शूटिंग करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. शूटिंग करताना मला अजिबात वाटले नव्हते की हा सिनेमा भातीय सिनेमाचा इतिहासात मैलाचा दगड ठरेल. फ्लॉप घोषित होण्यापासून ते बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाईकरेपर्यंत या सिनेमाच्या बदलाने यांच्याशी जोडलेला प्रत्येकजन भावुक झाला आहे. या एक सर्वोत्तम सिनेमा आहे. आता हेरिटेज फाउंडेशन या सिनेमाला अनकट दृश्यासहित रिलीज करण्याचे ठरवले आहे. मला आशा आहे 50 वर्षानंतरही हा सिनेमा जगातील नवीन प्रेक्षकांना आकर्षित करेल.
यावर धर्मेंद्र म्हणतात, ‘शोले म्हणजे माझ्यासाठी जगातील आठवे आश्चर्य आहे. आताही या सिनेमाला अशीच प्रसिद्धी मिळेल जशी पहिल्यांदा मिळाली होती. या सिनेमातील अनेक दृश्य परिणामकारक आहेत. जसे की टाकीवाला सीन, मंदिर वाला सीन पण मला सगळ्यात परिणामकारण सीन वाटतो तो म्हणजे जयचा मृत्यू. हा सीन आजही माझ्या मनात आहे.