Oscar Award On You Tube: ऑस्कर सोहळा युट्यूबवर मोफत पाहता येणार... ABC सोबतची ५० वर्षाची साथ येणार संपुष्टात
Oscar Award On You Tube: ऑस्करचे स्ट्रीमिंग आता यट्यूबवर देखील होणार आहे. हा हॉलीवूडमधील एक मोठा बदल म्हणावा लागेल कारण गेल्या ५० वर्षांपासून ABC ही या सोहळ्याचे प्रक्षेपण करत होती. मात्र २०२९ पासून युट्यूवर लाईव्ह आणि मोफत पाहता येणार आहे. याबाबतचा करार अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट आणि सायन्सने केला असून याची घोषणा बुधवारी करण्यात आली. युट्यूबसोबतचा हा ग्लोबल राईट्सचा करार २०३३ च्या ऑस्कर सोहळ्यापर्यंत असणार आहे.
यंदाचा ऑस्कर सोहळा हा १५ मार्च रोजी प्रक्षेपित करण्याची योजणा असून हा सोहळा ABC वरून प्रक्षेपित होणारा ५० वा ऑस्कर सोहळा असणार आहे. ABC २०२८ पर्यंत ऑस्करचे प्रक्षेपण करणार आहे. २०२८ चा ऑस्कर सोहळा हा १०० वा ऑस्कर सोहळा आहे.
अकॅडमी सीईओ बील क्रामेर आणि अकॅडमी अध्यक्ष लेंटी होवेल टेलर यांनी अधिकृत वक्तव्यात सांगितलं की, 'द अकॅडमी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आमची युट्यूबसोबतची नवी भागीदारी ही आम्हाला अकॅडमीचे काम मोठ्या जगभरात प्रेक्षक संख्येपर्यंत पोहचवता येणार आहे. याचा फायदा आमच्या अकॅडमी सदस्यांना आणि चित्रपट समुदायाला होणार आहे.'
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दशकभरात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या प्रक्षेपणाची व्ह्युवरशिप कमी होत होती. यामध्ये २०२५ मध्ये थोडी वाढ झाली होती. आता तरूण सदस्य आता हा सोहळा मोबाईल अन् कॉम्पुटरवर पाहत आहेत.
दरम्यान, युट्यूबचे सीईओ नेअल नील मोहन यांनी ऑस्करला एक महत्वाची सांस्कृतिक संस्था असं संबोधलं आहे. त्यांनी अकॅडमी पुरस्कार सोहळ्यासोबत भागीदारीमुळं त्यांच्या कथा अन् वारसा नवीन सृजनशील पिढीला आणि चित्रपट प्रेमींना प्रेरित करतील.
विशेष म्हणजे एबीसी ऑस्कर पुरस्कार सोहळा हा १९७६ पासून प्रक्षेपित करत आहे. आता ते पुढचे तीन ऑस्कर पुरस्कार सोहळे प्रक्षेपित करणार आहेत.

