

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. शुक्रवारी सांयकाली वृत्त समोर आले की, वैजयंतीमाला यांनी जगाला अलविदा म्हटलं आहे. पण, त्यानंतर त्यांच्या मुलाने या निधनाच्या वृत्तामागील सत्य सांगितलं आहे.
बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक वैजयंतीमाला यांचे निधन झाल्याचे वृत्त पसरले. शुक्रवारी सायंकाळी वृत्त समोर आले की, वैजयंतीमालाने जगाला अलविदा म्हटलं आहे. त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शोकचे वातावरण झाले. त्यानंतर त्यांच्या मुलाने एक पोस्ट शेअर करून निधनाच्या वृत्तामागील सत्य सांगितलं. त्याची आई वैजयंतीमाला यांच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला.
वैजयंतीमाला यांच्या निधनाच्या वृत्तामागील सत्य काय आहे, त्याचे सत्य त्यांच्या मुलाने सांगितले. त्यांचा मुलगा सुचिंद्रा बालीने आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या अफवांवर फुल स्टॉप लावला. सुचिंद्रा बालीने एक पोस्ट लिहून म्हटलंय - “डॉ. वैजयंतीमाला बाली यांची चांगली प्रकृती आहे. कोणतेही वृत्त जे त्यांच्या विरोधात येत आहे, ती खोटी आहे. शेअर करण्याआधी, कृपया पुष्टी करा. वैजयंतीमाला स्वस्थ आहेत.”