

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता विक्रांत मेस्सीचा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' लवकरच रिलीज होणार आहे. घोषणेनंतर चित्रपट एका वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. दरम्यान विक्रांत मेस्सीने खुलासा केला आहे की, त्याला दीर्घकाळापासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. आगामी चित्रपटामुळे त्याला या धमक्या मिळत असल्याचे म्हटले जात आहे.
विक्रांतला चित्रपट द साबरमती रिपोर्टच्या प्रमोशनल इवेंटमध्ये विचारण्यात आले की, काय त्याला धमक्या मिळत आहेत. यावर अभिनेत्याने म्हटले की, हो. ही गोष्ट मला आतापर्यंत कुणीही विचारली नाही. म्हणून मी सांगितलं नाही. मला धमक्या मिळत आहेत. पण आम्ही कलाकार आहे. लोक काय विचार करतात आणि त्यांना काय वाटतं यामुळे फर्क पडत नाही. मला हे सांगायचं आहे की, द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट संपूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे. दुर्देवाने तुम्ही हा चित्रपट आतापर्यंत पाहू शकलेला नाही. म्हणूनचं चित्रपट पाहण्याआधी कोणताही दृष्टीकोण ठरवू नका.
६ नोव्हेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इवेंट ठेवण्यात आला होता. हा चित्रपट आधी ३ मे रोजी रिलीज करण्यात येणार होता. लोकसभा निवडणुकीसाठी चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात विक्रांत मेस्सी, रिद्धी डोगरा, राशी खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये विक्रांत मेसी, राशी खन्ना, रिद्धि डोगरा पत्रकाराच्या भूमिकेत आहेत. सन २००२ च्या गोध्रा कांडवर आधारित आहे. रंजन चंडेलने हे दिग्दर्शित केले आहे.
ट्रेलर लॉन्च नंतर द साबरमती रिपोर्ट ट्रेंड होत आहे. ट्रेलर लॉन्चनंतर सर्वाधिक हा चित्रपट सर्च होत आहे.