पुढारी ऑनलाईन डेस्क : थलपती विजयचा आगामी चित्रपट The Greatest of All Time ची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. त्याआधी चित्रपटाच्या रिलीज डेटसोबतच ट्रेलरची रिलीज डेट देखील जाहीर झाली आहे. थलपती विजयचा चित्रपट द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम कधी रिलीज होणार, पाहुया.
थलपती विजयचा मोस्ट अवेटेड चित्रपट The Greatest of All Time चे पोस्टर आधीच रिलीज करण्यात आले होते. यामध्ये थलापती विजयची दुहेरी भूमिका होती. त्यानंतर चाहत्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती की, थलपती विजयचा चित्रपट The Greatest of All Time चा ट्रेलर कधी रिलीज होणार. चित्रपटाच्या रिलीज डेट सोबतच आता चित्रपटाचा ट्रेलर देखील कधी येणार, याकडे लक्ष लागले आहे. थलपती विजयचा चित्रपट GOAT चे ट्रेलर स्वातंत्र्य दिनी खास औचित्याने म्हणजेच १५ ऑगस्ट, २०२४ रोजी रिलीज होऊ शकतो. परंतु, आतापर्यंत निर्मात्यांनी ही तारीख जाहीर केलेली नाही.
GOAT चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर, २०२३ मध्ये वर्किंग टायटल Thalapathy 68 सोबत सुरू झाली होती. निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर ३१ डिसेंबर, २०२३ रोजी जारी केलं होतं. त्यानंतर दुसरा प्रमोशनल फोटोदेखील जारी केला होता. थलपती विजयच्या GOAT चित्रपटाचा तिसरे पोस्टर १५ जानेवारी रोजी जारी करण्यात आले. हा चित्रपट सायन्स फिक्शन आहे. यामध्ये तो दुहेरी भूमिकेत असेल.