काही दिवसांपूर्वी विद्या बालनने तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला. तिने सांगितले की, एका चित्रपट दिग्दर्शकाने चेन्नईतील त्याच्या खोलीत बोलावले होते, पण योग्य वेळी मी तिथून धूम ठोकली आणि स्वतःला कास्टिंग काऊचचा बळी होण्यापासून वाचवले. मात्र, यानंतर तिला चित्रपट गमवावा लागला. तो दिग्दर्शक कोण हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवले आहे. ती सांगते की, मी एका जाहिरातपटाच्या शूटिंगसाठी चेन्नईला गेले होते.
दिग्दर्शकाने मिटिंगसाठी बोलावले. मी चित्रपटाला होकार दिल्यामुळे दिग्दर्शकाला भेटायला गेले. आम्ही कॉफी शॉपवर भेटलो आणि नंतर त्याने खोलीत जाण्याचा आग्रह धरला. विद्या म्हणाली, मी खूप आभारी आहे की, मी यातून गेले नाही. मी अशा अनेक भयपट कथा ऐकल्या आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझ्या आई-वडिलांची हीच सर्वात मोठी भीती होती. यामुळे माझे आई-वडील माझ्या चित्रपटात करिअरविषयी खूश नव्हते. दरम्यान, विद्या बालन अलीकडच्या काळात शेफाली शाहसोबत 'जलसा'मध्ये दिसली होती.