पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) महाअवतार (Mahavatar) चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. विकी कौशल भगवान परशुराम यांच्या अवतारात दिसत आहे. निर्माता दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या महाअवतार या चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट लूक फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.
अभिनेता विकी भगवान परशुरामच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पाहता येणार आहे.
याची घोषणा निर्मात्यांनी १३ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर केली होती. चित्रपटाचे शीर्षक आणि मोशन पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुपरस्टार विकी कौशल भगवान परशुराम यांच्या भूमिकेत दिसत आहे. विकी कौशल स्टारर 'महाअवतार' डिसेंबर २०२६ मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विकी कौशल यापूर्वी दिनेश विजन यांच्या 'जरा हटके जरा बचके' या रोमँटिक कॉमेडीमध्ये दिसला होता. विकी मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत चित्रपट छावा या चित्रपटातही दिसणार आहे.