अभिनेता नागार्जुनने अडीच कोटींची कार खरेदी केली instagram
मनोरंजन
अभिनेता नागार्जुनने खरेदी केली अडीच कोटींची कार, व्हिडिओ व्हायरल
Nagarjuna New luxury Car | अभिनेता नागार्जुनने खरेदी केली अडीच कोटींची कार, व्हिडिओ व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क - तेलुगु अभिनेते नागार्जुन अक्किनेनी यांनी गुरुवारी आपल्या नव्या कारचे रजिस्ट्रेशन केले आहे. नवी कारचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांनी खैरताबाद येथील क्षेत्रीय परिवहन कार्यालय (आरटीओ-Regional Transport Authority (RTA) ) येथे भेट दिली. यावेळी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागार्जुन यांचे स्वागत केले. lexus car चे रजिस्ट्रेशनसाठीची औपचारिकता त्यांनी तत्काळ पूर्ण केली. सूत्रांच्या माहितीनुसार, नागार्जून यांचे डिजिटल अंगठ्याचे ठसे आणि सही घेतल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली. या lexus कारची किंमत २.५ कोटी रुपये आहे.
दरम्यान, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचे प्रीवेडिंग फंक्शन आज ३० नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

