

पुढारी ऑनलाईन डेस्क - मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता पवन हंसमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत अभिनेता-चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निवासस्थानी रुग्णालयातून पार्थिव आणण्यात आले होते. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्य, बॉलीवूड जगतातील मंडळी आणि चाहत्यांनी गर्दी केली होती.
८७ वर्षीय पद्मश्री पुरस्कार विजेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी एका रुग्णालयात निधन झाले. २१ फेब्रुवारी पासून त्यांची प्रकृती बरी नसल्याचे म्हटले जात होते.
"मनोज कुमार लोकांच्या मनात होते, असे खूप कमी लोक पाहायला मिळतात, ...ते अखेर पर्यंत भारताबद्दलच्या गोष्टी करत. माझ्याकडे त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांनी मला एक शिकवण दिली होती जी मला नेहमी आठवणीत राहते. जेव्हा मी त्यांचे चरणस्पर्श केले तेव्हा ते अंथरुणावर झोपले होते. ते मला म्हणाले होते की, खोटं बोलणाऱ्यांचे कधी चरण स्पर्श केला जात नाही. मी त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन करतो."
-माजी राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा
भारतीय चित्रपट उद्योगाने एक असा हिरा गमावला आहे, ज्याने नेहमी स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त लोकांना सेल्यूलाईडच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली. त्यांनी देश आणि परदेशात लोकांना भारताचे गौरव दाखवले. ते एक लेखक, अभिनेते, दिग्दर्शक, एक महान व्यक्ती होते... मला आठवण आहे की जेव्हा मी शहीद उधम सिंहच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करत होतो, तेव्ही मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो, त्यांनी मला आशीर्वाद दिला, मी त्यांना म्हटलं की, त्यांनी मला प्रेरित केलं. ...त्यांनी माझ्या चित्रपटाच्या टीमची भेट घेतली आणि काही बदल सुचवले, त्याचे आम्ही अनुसरण केले. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा.
- अभिनेते राज बब्बर
ते नेहमी एक लीजेंड राहिले आहेत, आम्हा सर्वांसाठी ते प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून देशभक्तीच्या भावनांचे प्रदर्शन केले आणि लोकांना हे दाखवून प्रेरित केलं की, भारत काय आहे आणि भारत कसा असायला हवा.
सुभाष घई