पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वांचा लाडका अभिनेता वरुण धवनने नुकतेच ३ जून रोजी बाबा झाला आहे. वरूणची पत्नी आणि अभिनेत्री नताशा दलालने एका गोडस मुलीला जन्म दिला. घरात दोघांनी या चिमुलकल्या पाहूणीचे जोरदार स्वागत केलं. यानंतर आज फादर्स डेच्या निमित्ताने वरूणने आपल्या मुलीची पहिली झलक दाखविली आहे.
अभिनेता वरुण धवनने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्रामवर मुलीची झलक दाखविताना दोन फोटो शेअर केलं आहे. यातील पहिल्या फोटोत वरूणच्या हातात मुलीचा हात दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत वरूणने एका कुत्र्याचा पाय आपल्या हातात धरलेला दिसतोय. मात्र, वरूणने फोटो शेअर करताना मुलीचा चेहरा स्पष्टपणे दाखविलेला नाही. यावेळी वरूणने व्हाईट रंगाच्या कुर्ता परिधान केला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये वरूणने लिहिलंय आहे की, "फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे की, हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिथे जाऊन तुमच्या कुटुंबासाठी काम करणे होय. आजच्या दिवशी मी तेच करत आहे. एका मुलीचा बाप होण्यापेक्षा सर्वात मोठा आनंद काय असू शकतो."
वरूणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी भरभरून कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने लिहिलं आहे की, "वरूण आता मोठा झाला आहे.", चित्रपट निर्मात्या झोया अख्तरने दोन लाल रंगाचे हॉर्ट इमोजी शेअर केलं आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने सहा लाल रंगाचे हार्ट इमोजी शेअर केलं आहेत. याशिवाय अभिनेता मनीष पॉलने "सर्वोत्तम सर्वोत्तम सर्वोत्तम… मुली एक आशीर्वाद आहेत." असे कॉमेन्टसमध्ये लिहिलं आहे. १ तासांत या फोटोला जवळपास ३ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
हेही वाचा