
पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘वनवास’ हा आगामी चित्रपट येऊ घातला आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा केली होती आणि आता, कोणताही विलंब न लावता, त्यांनी हा उत्कट चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख घोषित केली आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सिनेगृहात दाखल होईल. (Nana Patekar Vanvaas Movie )
‘वनवास’ ही एक चित्तवेधक कथा आहे, ज्याची संकल्पना ही कालातीत आहे. निर्मात्यांनी अखेर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख निश्चित केली आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी दाखल होत आहे. सोशल मीडियावर चित्रपट निर्मात्यांनी ‘वनवास’ प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केलीय. (Nana Patekar Vanvaas Movie )
‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याकरवी आणखी एक उत्तम चित्रपट दाखल होत आहे- ‘वनवास’ या चित्रपटाची कथा चित्तवेधक आणि खिळवून ठेवेल अशी आहे. या चित्रपटात नाना पाटेकर आणि गदर २ मधील भूमिकेकरता नावाजलेले गेलेले उत्कर्ष शर्मा दिसणार आहेत.
अनिल शर्मा लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित ‘वनवास’ हा चित्रपट ‘झी स्टुडिओज’द्वारे जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.