Haan Tu Ti Tu song : ‘सजन घर आओ रे’ गाण्यानंतर नवं रोमँटिक गाणं भेटीला

Vaibhav Lamture-Suvarna Darade
Vaibhav Lamture-Suvarna Darade
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सजन घर आओ रे' या गाण्याच्या यशानंतर 'श्रीनिवास कुलकर्णी प्रॉडक्शन' प्रस्तुत 'हा तू…ती तू' हे रोमॅंटीक गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. प्रेम आणि भावनांच्या अविस्मरणीय प्रवासाचे दर्शन या गाण्यात दिसून येते. अभिनेता वैभव लामतुरे आणि अभिनेत्री सुवर्णा दराडे ही सुंदर जोडी या गाण्यात एकत्र दिसणार आहे. (Haan Tu Ti Tu song ) राहूल झेंडे यांनी गाण्याच दिग्दर्शन व संकलन अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली आहे तर छायाचित्रण शुभम धूम यांनी केलं आहे. गायक अभिमन्यू कार्लेकर याने मधाळ आवाजात हे गाणं गायलं आहे व संगीतबद्ध देखील केलं आहे. गाण्याचे बोल सागर बाबानगर यांनी लिहीले आहे. शिवाय मेकअप सुरेश कुंभार, सह दिग्दर्शन संदीप बोडके, क्रिएटिव्ह प्रोडूसर आणि कॉस्ट्यूम रचना रघुनाथ यांनी केले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याचं चित्रीकरण निसर्गरम्य कोकणातील नांदगावमधील पौड गावात झालं आहे. (Haan Tu Ti Tu song )

निर्माते श्रीनिवास कुलकर्णी गाण्याविषयी सांगतात, 'हा तू…ती तू' या गाण्याचे कथानक एका भावनिक प्रेम त्रिकोणाभोवती फिरते. ज्यात गावातील एक तरुण युवक आणि त्याची बहिण तसेच एक तरूण युवती यांच्याभोवती फिरणारं हे कथानक आहे. अभिनेता वैभव लामतुरे आणि अभिनेत्री सुवर्णा दराडे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे, लोकप्रिय बालकलाकार अनन्या टेकवडे ही लहान बहिणीच्या भूमिकेत दिसत आहे तर आसावरी नितीन यांनी आईची भूमिका साकारली आहे.

पुढे ते चित्रीकरणाचा किस्सा सांगतात, "कोकणातील नांदगावमधील पौड गावात या गाण्याचं चित्रीकरण करत असताना या गावात जत्रा भरली होती. त्यामुळे सगळ्या टीमला टेन्शन आलं होतं. आता हे गाणं कसं चित्रीत करणार कारण, कॅमेरा आणि शूटींगचं साहित्य काढलं की लगेच लोकांची गर्दी जमायची. आणि चित्रीकरणाच्या दिवशी जत्रेचा शेवटचा दिवस होता. पण त्या एकाच दिवसात शूटींग करायचं होतं. अचानक दुपारी जत्रेच्या ठिकाणी लोकांची वर्दळ कमी व्हायला लागली. मग क्रूने गावातील काही लोकांना विचारलं असता, असं समजलं की गावाच्या पलिकडे कुस्त्यांच्या स्पर्धा भरल्या आहेत. म्हणून गावातील निम्म्याहून अधिक लोक कुस्त्या बघण्यासाठी गेले. मग आम्ही त्या अर्ध्या दिवसात गाण्याचं चित्रीकरण केलं. गाणं चित्रीत करताना खूप धम्माल आली."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news