New Marathi TV Serial Vachan Dile Tu Mala milind gawli return
आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध आता पुन्हा परतमार एका नव्या रुपात. दिग्गज अभिनेते मिलिंद गवळी आता आगामी मालिका वचन दिले तू मला मधून सर्वांसमोर येणार आहे. खास बाब म्हणजे वचन दिले तू मला या मालिकेतून नामांकित वकील हर्षवर्धन जहागिरदार हे पात्र ते साकारणार असून अनिरुद्ध नंतर पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
त्यांचा प्रत्येक मालिकेतील सहजसुंदर अभिनय तर घराघरात पोहोचलं आहे. नवी गोष्ट घेऊन मिलिंद गवळी स्टार प्रवाहवरील या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येताहेत.
काय आहे वकील हर्षवर्धन जहागिरदारचं पात्र?
हर्षवर्धन जहागिरदार हा कायद्याची उत्तम जाण असणारा निष्णात वकील असून प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे प्रतिस्पर्धी वकील देखील त्यांना घाबरतात. हर्षवर्धनच्या मते न्याय हा फक्त सत्याच्या बाजूने उभा राहूनच नाही तर पैसे देऊन विकतही घेतला जाऊ शकतो. प्रचंड अहंकारी असलेला हर्षवर्धन पराभव स्वीकारु शकत नाही. जेव्हा मालिकेची नायिका ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हर्षवर्धनच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी उभी रहाते तेव्हा त्याच्या याच अहंकाराला ठेच पोहोचते आणि तिथूनच सुरुवात होते नव्या लढ्याला.
हर्षवर्धन जहागिरदार निष्णात वकील आहे. माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे कायद्याची त्यांना उत्तम जाण आहे. त्यामुळे ऐकताक्षणीच ही भूमिका खूप जवळची वाटली. वडिलांकडून खूप गोष्टींची माहिती करून घेतोय.
- मिलिंद गवळी, अभिनेते
अनुष्का सरकटे-अभिनेता इंद्रनील कामत नवी जोडी येणार
अभिनेत्री अनुष्का सरकटेने ऊर्जा ही भूमिका साकारलीय. हुशार, हजरजबाबी, धाडसी वकील ऊर्जाची आणि तिच्या न्यायासाठीच्या लढाईत खंबीरपणे साथ देणाऱ्या अॅडव्होकेट शौर्यची ही गोष्ट आहे. शशांक सोळंकी यांच्या सेवेन्थ सेन्स मीडिया या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. वचन दिले तू मला १५ डिसेंबरपासून पाहता येणार आहे.