पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर सक्रिय असते. उर्वशी तिची फॅशन आणि बोल्डनेससाठी चर्चेत असते. आता वेगळाच कारणाने उर्वशी चर्चेत आली आहे. तिने वाढदिवसाला केलेल्या खर्चामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
२५ फेब्रुवारीला उर्वशीचा वाढदिवस असतो. पॅरिसला जाऊन आयफेल टॉवरवर तिने तिचे बर्थडे सेलिब्रेशन केले. उर्वशीने नुकतेच तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. हा तिचा वाढदिवस साजरा करताना तिने लाखो रुपये खर्च केले.
उर्वशीकडे २४ कॅरेट सोन्याचे कपकेक आणि १०० डायमंड जडलेल्या गुलाबांचा डायमंड केक होता आणि संपूर्ण सजावट ही हेलियम फुगे, गुलाबी आणि लाल गुलाब आणि मेणबत्त्यांनी सजलेली होती. या वाढदिवसासाठी तिने एकूण ९३ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता उर्वशीचे हे बर्थडे सेलिब्रेशन आणि या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ खूपच चर्चेत आले आहेत. या फोटोवर कमेंट करत उर्वशीच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.