

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी चित्रपटामुळे नव्हे, तर तिच्या एका दाव्यामुळे. एका मुलाखतीदरम्यान उर्वशीने असं विधान केलं की, उत्तराखंडमधील बद्रीनाथजवळ तिच्या नावाचं मंदिर आहे. "जर कोणी बद्रीनाथला गेला, तर तिथे ‘उर्वशी मंदिर’ आहे," असं ती म्हणाली आणि त्यानंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि प्रतिक्रियांचा पूर आला.
एका यूट्यूबर-ब्रॉडकास्टरसोथ पॉडकास्टमध्ये उर्वशीने दावा केला की, “बद्रीनाथ मंदिराच दर्शन करायला गेला तर त्याच्या बाजूस एक मंदिर आहे, उर्वशी”. जेव्हा प्रेजेंटरने विचारलं की, मंदिर तुझ्या नावावर आहे, तुला समर्पित आहे? तेव्हा उत्तरादाखल उर्वशी म्हणाली “हो तिथे उर्वशी मंदिर आहे”.
उर्वशी उत्तराखंडचीच असल्यामुळे तिने आपल्या गावाचा अभिमान व्यक्त करत हे विधान केलं. पण तिच्या या विधानाने लोकांना बुचकळ्यात टाकलं. अनेकांना वाटलं की, हे एखादं प्रमोशनल स्टंट असेल, तर काहींनी मीम्स टाकायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर यावरून खूप मजेशीर मीम्स तयार झाले. काहींनी लिहिलं, "उर्वशी मंदिर? मग ... मठसुद्धा असणार!", तर काहींनी टोकाचं विधान करत म्हटलं, "Temple नाही, Mental वाटते!" काहींनी तिच्या विधानाचा विनोद केला. तर काहींनी तिला सल्लाही दिला की, "थोडं वास्तवात ये."
उर्वशीने एक हे जे काही म्हटलं त्यामुळे ती पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये आलीय. ती नेहमीच आपल्या बोलण्यामुळे, वेगळ्या कपड्यांमुळे किंवा वागण्यामुळे चर्चेत राहते.