मायावती यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणे भोवले! केआरकेविरोधात गुन्हा

KRK
KRK

पुढारी ऑनलाईन डेस्क : कमाल राशिद खान उर्फ केआरकेविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी केआरकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बसपा प्रमुख मायावती यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी केआरकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा-

काय आहे संपूर्ण प्रकरण?

केआरकेने X अकाऊंटवर मायावती यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्याच्यानंतर सहारनपूरच्या देवबंद ठाण्यात गुन्हा दाखल झाला. केआरके हा मुळचा सहारनपूर जिल्ह्यातील थाना देवबंदअंतर्गत ग्राम फुलास अकबरपूरचा रहिवासी आहे. केआरकेवर बसपा नेते सुशील कुमार यांनी केस दाखल केली आहे.

अधिक वाचा-

सोशल मीडियावर वादग्रस्त विधानानंतर मायावती यांच्या आदेशानंतर केआरकेचे भाऊ, सहारनपूर लोकसभा क्षेत्राचे बसपा उमेदवार माजिद अली यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. कमालचा भाऊ माजिद अली यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पणे ते पराभूत झाले. दरम्यान, याप्रकरणी माजिद अली म्हमाले होते की, त्यांचे केआरकेशी मागील १५ वर्षांपासून कोणताही संबंध नाही.

अधिक वाचा-

केआरके विरोधातील तक्रारीत काय म्हटलंय?

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, बसपा प्रमुखवर करण्यात आलेल्या विधानामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. दलित समाज मायावती यांचे मनापासून सन्मान आणि आदर करतो. कमाल राशिद खानने X वर बहिणविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून दलित समाजाला अपमानित केलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news