उदे गं अंबे..कथा साडे तीन शक्तीपिठांची | लवकरचं भेटीला

Ude Ga Ambe Ude | नीलिमा कोठारे-नीता खांडके यांनी सांगितला अनुभव
Ude Ga Ambe Ude tv serial
उदे गं अंबे..नवी मालिका भेटीला instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - नवरात्रौत्सवाच्या धामधूमीत स्टार प्रवाहवर ‘उदे गं अंबे… कथा साडे 'तीन शक्तीपिठांची’ या मालिकेच्या रुपात अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्तीच भक्तांच्या घराघरात अवतरणार आहे. महाराष्ट्राची श्रद्धास्थाने असलेल्या साडेतीन शक्तीपिठांची अभुतपूर्व गोष्ट भव्यदिव्य मालिकेच्या माध्यमातून सादर करण्याचा यत्न आहे. देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी निर्माते महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा कोठारे आणि त्यांच्या सहकारी नीता खांडके यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान होतं.

महाराष्ट्रभर फिरून नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी देवीचे दागिने बनवून घेतले. देवीचं रुप साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. देवीनेच आमच्याकडून हे करवून घेतल्याचं त्या म्हणाल्या. देवीचा मुकूट, कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कंबरपट्टा, तोडे, बाजूबंद, हार, कंठी, कुंडले या अलंकारांना फार महत्त्व आहे. हे सगळे अलंकार परिधान केलेल्या देवीचं रुप आपल्याला निशब्द करुन टाकतं. उदे गं अंबे ही महामालिका करण्याचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर आम्ही दागिन्यांची शोधमोहिम सुरु केली. देवीसाठी लागणाऱ्या साड्या देखील खास बनवून घेतल्या आहेत.

आदिशक्तीचं रुप साकारणारी अभिनेत्री मयुरी कापडणेला जेव्हा आम्ही देवीच्या रुपात पाहिलं तेव्हा आम्हालाही साक्षात देवी समोर असल्याचा भास झाला. माहूरची देवी रेणुका, तुळजापूरची देवी भवानी माता,कोल्हापूरची देवी अंबाबाई आणि वणीची देवी सप्तशृंगी ही देवीची चार वेगळी रुपं मालिकेसाठी घडवण्याची संधी मिळणं हा देवीचाच आशीर्वाद आहे,अशी भावना नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी व्यक्त केली. आदिशक्तीचं स्वरूप विराट आणि विश्वाकार आहे. ती जगतजननी आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी भक्तांची तारणहार आहे आणि म्हणूनच या साडेतीन शक्तिपीठांचा महिमा अपार आहे. याच साडे तीन शक्तीपीठांची सविस्तर भावगर्भ आणि भक्तिरसपूर्ण कहाणी ११ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news