टीव्‍ही कलाकारांनी ‘या’ प्रसिद्ध शिव मंदिरांमध्ये घेतला आशीर्वाद

ॲण्‍ड टीव्‍हीवरील मालिकांमधील प्रमुख कलाकार
ॲण्‍ड टीव्‍हीवरील मालिकांमधील प्रमुख कलाकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाशिवरात्री सण साजरा करण्‍यासाठी ॲण्‍ड टीव्‍हीवरील मालिकांमधील प्रमुख कलाकार जसे मालिका 'अटल'मधील यंग अटल, कृष्‍णा देवी वाजपेयी व कृष्‍णन बिहारी वाजपेयी, मालिका 'भाबीजी घर पर है'मधील विभुती नारायण मिश्रा व अनिता भाबी, मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील दरोगा हप्‍पू सिंग व त्‍याची दबंग दुल्‍हनिया राजेश यांनी भारतातील सर्वात प्रतिष्ठित भगवान शिव मंदिरांना भेट दिली. अटल (व्‍योम ठक्‍कर), नेहा जोशी (कृष्‍णा देवी) आणि आशुतोष कुलकर्णी (कृष्‍णन बिहारी वाजपेयी) यांनी मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्‍ये भगवान शिवचा आशीर्वाद घेतला. आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा) आणि विदिशा श्रीवास्‍तव (अनिता भाबी) यांनी त्‍यांचे मूळगाव वाराणसीला भेट देऊन जगप्रसिद्ध श्री काशी विश्‍वनाथ मंदिरामध्‍ये शिव महोत्‍सवाचा आनंद घेतला. योगेश त्रिपाठी (दरोगा हप्‍पू सिंग) आणि गीतांजली मिश्रा (राजेश सिंग) यांनी इंदौरला भेट देऊन उज्‍जैनमधील सर्वात प्रतिष्ठित भगवान शिव मंदिर – श्री महाकालेश्‍वर ज्‍योतिर्लिंग मंदिरामध्‍ये जाऊन दर्शन घेतले.

मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराला भेट देण्‍याबाबत ॲण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'अटल'मधील नेहा जोशी ऊर्फ कृष्‍णा देवी वाजपेयी म्‍हणाल्‍या, "महाशिवरात्रीच्या दैवी उत्सवात सहभागी होण्यासाठी मी आशुतोष आणि व्योम यांच्यासह मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराला भेट दिली."

आशुतोष कुलकर्णी ऊर्फ कृष्णन बिहारी वाजपेयी म्‍हणाले, "मी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे, पण कधीच बाबुलनाथ मंदिरात गेलेलो नाही. हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. बाबुलनाथ मंदिराची भेट प्रसन्‍नतेचा अनुभव देणारी ठरली."

'अटल'मध्‍ये यंग अटलची भूमिका साकारणारा व्‍योम ठक्‍कर म्‍हणाला, "मी पहिल्‍यांदाच बाबुलनाथ मंदिराला भेट दिली. प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर तेथील भक्‍तीमय व आध्‍यात्मिक वातावरण पाहून भारावून गेलो."

वाराणसीच्‍या शिव काशी विश्‍वनाथ मंदिराला भेट देण्‍याबाबत 'भाबीजी घर पर है'मधील आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले, "काशी विश्‍वनाथ मंदिराला भेट देण्‍याची माझी दीर्घकाळापासून इच्‍छा होती आणि अखेर ही इच्‍छा पूर्ण झाली आहे, ज्‍यासाठी मी आभार व्‍यक्‍त करतो."

'भाबीजी घर पर है'मधील विदिशा श्रीवास्‍तव ऊर्फ अनिता भाबी म्‍हणाल्‍या, "या वर्षी मला पुन्हा माझ्या गावी श्री काशी विश्वनाथ मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी परतण्याचे भाग्य लाभले. मी निस्‍सीम शिवभक्त आहे आणि या वर्षीची भेट अनेक कारणांमुळे विशेष होती. मला माझी मुलगी 'आद्या'च्‍या जन्‍मासह आशीर्वाद दिल्याबद्दल मी भगवान शिवचे आभार मानले."

उज्‍जैनमधील श्री महाकालेश्‍वर ज्‍योतिर्लिंगला भेट देण्‍याबाबत 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाले, "या पवित्र मंदिरात भगवान शिवचा आशीर्वाद घेतल्याने शांतता आणि समाधान मिळाले. माझी मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'ला यशस्‍वी पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी भगवान शिवची प्रार्थना केली. इंदोर आणि उज्‍जैनला भेट माझ्यासाठी नेहमीच खास राहील. मी मोठा फूडी आहे, ज्‍यामुळे आम्‍ही इंदौरच्‍या गजबजलेल्‍या बाजारपेठांमध्‍ये भेट दिली आणि तेथील भोजनालयांमध्‍ये फूडचा मनसोक्‍त आस्‍वाद घेतला."

'हप्‍पू की उलटन पलटन'मध्‍ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्‍हणाल्‍या, "महाशिवरात्री आणि आमच्‍या मालिकेच्‍या पाच यशस्‍वी वर्षांना साजरे करण्‍यासाठी यासारखा दुसरा उत्तम क्षण नाही. मी महाकाल मंदिरामध्‍ये प्रवेश करताच आध्‍यात्मिक व भक्‍तीमय वातावरणामध्‍ये भारावून गेले. इंदौरमध्ये मी माझ्या आवडत्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला, माझ्या भाची व पुतणीसाठी भेटवस्तू खरेदी केल्या आणि गजबजलेल्या सराफा बाजारामध्‍ये फेरफटका मारला."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news