पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठी चित्रपट 'तुंबाड' २०१८ मध्ये रिलीज झाला होता. आता चित्रपट पुन्हा भेटीला येत आहे. निर्माते हा चित्रपट १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात पुन्हा रिलीज करणार आहेत. दरम्यान, 'तुंबाड'चा एक नवा ट्रेलरदेखील रिलीज करण्यात आला आहे. दमदार आवाज आणि डिझाईनसह ट्रेलर खूप उत्तमरित्या दाखवण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या री-रिलीजसोबत थरकाप उडवणारा 'तुंबाड' अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाने ६४ व्या फिल्मफेयर ॲवॉर्ड्समध्ये अनेक पुरस्कार जिंकले होते. ७५ व्या वेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शन राही अनिल बारवे यांचे आहे. निर्मिती सोहम शाह, आनंद एल राय, मुकेश शाह आणि अमिता शाह यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये सोहम शाह, ज्योती माल्शे आणि अनीता केळकर मुख्य भूमिकेत आहेत.
याचित्रपटासाठी निर्मात्यांनी जवळपास ५ कोटी रुपये खर्च केले होते. रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये बॉक्स ऑफिसवर एकूण १३.५७ कोटींची कमाई केली होती.