Tumbadchi Manjula BO: फक्त 6 कोटी बजेट! राजा शिवाजीनंतर आता ‘तुंबाडची मंजुळा’; बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, किती कोटी कमावले?

Tumbadchi Manjula Box Office Collection 17 Days: ‘तुंबाडची मंजुळा’ या मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपटाने अवघ्या 17 दिवसांत 13.57 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Tumbadchi Manjula Box Office Collection
Tumbadchi Manjula Box Office CollectionPudhari
Published on
Updated on

Tumbadchi Manjula Box Office Collection 17 Days: मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2026 हे वर्ष धमाकेदार ठरताना दिसत आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्यानंतर आता आणखी एका मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट म्हणजे ‘तुंबाडची मंजुळा’. हॉरर-कॉमेडी प्रकारातील या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या गाजावाजाशिवाय बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत निर्मात्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.

सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांसारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही आपली पकड कायम ठेवली आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित होऊनही प्रेक्षकांचा ओघ कायम असल्याने चित्रपटाच्या कमाईचा आलेख सातत्याने वर जात आहे.

चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी तब्बल 1.02 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे 16 व्या दिवशीच्या 75 लाख रुपयांच्या तुलनेत ही कमाई सुमारे 36 टक्क्यांनी अधिक आहे. आतापर्यंत चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 13.57 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून ग्रॉस कलेक्शन 16 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

‘तुंबाडची मंजुळा’चा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्याचे कमी बजेट. अवघ्या 6 कोटी रुपयांत तयार झालेल्या या चित्रपटाने 17 दिवसांतच 13.57 कोटी रुपयांची कमाई करत 7.57 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गुंतवणुकीवरील परतावा (ROI) तब्बल 126 टक्क्यांहून अधिक असल्याने चित्रपटाला अधिकृतपणे ‘हिट’चा दर्जा मिळाला आहे.

Tumbadchi Manjula Box Office Collection
Ration Card Update: रेशन कार्डचे नियम बदलले; आता कोणत्याही दुकानातून धान्य घेता येणार; रांगा आणि तुटवड्याचा त्रास संपणार

आता या चित्रपटासमोर आणखी एक मोठा टप्पा आहे. सुपरहिटचा मान मिळवण्यासाठी चित्रपटाला 150 टक्के परतावा आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपयांच्या नेट कमाईचा आकडा गाठावा लागेल. म्हणजेच चित्रपटाला आणखी फक्त 1.43 कोटी रुपयांची कमाई करायची आहे. सध्याचा वेग पाहता हा टप्पा पार करणे अवघड वाटत नाही.

चित्रपटाच्या यशामुळे मराठी सिनेसृष्टीतील हॉरर-कॉमेडी प्रकारालाही नवी ऊर्जा मिळाली आहे. विविध कोरगावकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून भावेश जानवलेकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, प्रियाल नाईक, गणेश पंडित, उमेश जगताप आणि योगेश शिरसाट यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत.

5 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेला ‘तुंबाडची मंजुळा’ आता 20 कोटींच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. चित्रपटाचा सध्याचा ट्रेंड पाहता प्रदर्शन संपेपर्यंत तो 25 कोटी रुपयांचा टप्पाही सहज पार करू शकतो, असा अंदाज चित्रपटसृष्टीतील जाणकार व्यक्त करत आहेत. मराठी चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि दर्जेदार कथानकांचे हे आणखी एक यशस्वी उदाहरण मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news