अक्षराच्या जुन्या मित्राची एन्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार?

Tula Shikvin Changlach Dhada - अक्षराच्या जुन्या मित्राची एन्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार?
Tula Shikvin Changlach Dhada
अक्षराच्या जुन्या मित्राची एन्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार?Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत भुवनेश्वरी, अक्षरा घराबाहेर राहत असल्याचं पुरेपूर फायदा घेत आहे. भुवनेश्वरी, अधिपती समोर स्वतःची चांगली छवी बनवून ठेवण्यासाठी अक्षरासोबत बोलायला जाते आणि तिथून आल्यावर ती अक्षरांनी न बोललेल्या गोष्टी अधिपतीला सांगून भडकावते. दुसरीकडे अक्षराला आई-बाबा समजावतात की तिने लवकरात लवकर अधिपतीला भेटून प्रेग्नेंसीची बातमी द्यावी. त्यावर अक्षरा ठरवते की संक्रांतीच्या दिवशी स्वत: जाऊन अधिपतीला भेटायचं. ती अधिपतीसाठी छान गिफ्ट तयार करते. अधिपतीने पण तिच्यासाठी छान साडी आणि हलव्याचे दागिने घेतले आहेत. दुर्गेश्वरी हे सर्व पाहून अधिपतीच्या साडीची पिशवी बदलते.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अक्षराला घरी घेऊन जायचं म्हणून अधिपती अक्षराच्या घरी येतो. पण घरात नेमकी इरा आहे. हीच संधी साधून इरा अक्षराविरुद्ध अधपतीला सगळी चुकीची माहिती देते. दुसरीकडे भुवनेश्वरीही अक्षराला दारातच अडवते. घर सोडलं तसं नातं पण विसरा असं जेव्हा अक्षराला सांगते तेव्हा अक्षरा तिला चांगलाच पलटवार देते. पलटवार बघून भुवनेश्वरी अक्षरावर हात उचलते. ह्याच आठवड्यात अक्षराच्या जुन्या मित्राचीही एन्ट्री होणार आहे आणि ही व्यक्ती आल्यानंतर अक्षरा-अधिपतीमधला गैरसमजम आणखी वाढत जाणार आहे.

कोण आहे हा अक्षराचा नवीन मित्र? अधिपतीला कळेल का की तो बाबा बनणार आहे? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी बघायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' रोज रात्री १०:३० वा. झी मराठीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news