पुढारी ऑनलाईन डेस्क - तेरी बातों में ऐसा उलझा जियाच्या यशानंतर शाहिद कपूरचा आगामी चित्रपट देवाची प्रतीक्षा होत आहे. दरम्यान, फॅन्सना उत्सुकता लागली आहे की, चित्रपटाची कहाणी काय असेल? देवाच्या रिलीज आधी शाहिद कपूरच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा झाली आहे.
शाहिद कपूरने २१ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. तो आता बी-टाऊनची भाभी नंबर २ म्हणजेच तृप्ती डिमरी सोबत दिसणार आहे. ॲक्शन थ्रीलरने भरपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करणार आहेत. त्याचा खुलासा निर्माते साजिद नाडियाडवालाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो आणि नोटच्या माध्य़मातून काही वेळापूर्वी केला आहे.
आज, १३ सप्टेंबर रोजी साजिद नाडियाडवाला ग्रँडसनच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजने त्यांच्या आगामी प्रोजेक्टची अधिकृत घोषणा पोस्ट केली आहे.
साजिदने पोस्टमध्ये आफला, शाहिद, विशाल आणि तृप्ती डिमरीच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय "मी खूप उत्साहित आहे. प्रतिभावंत दिग्दर्शक आणि माझे प्रिय मित्र विशाल भारद्वाज सोबत जोडलो गेलो. सोबतच पॉवरहाऊस अभिनेता शाहिद कपूरसोबत मिळून काम करण्यासाठी खूप उत्साहित आहे. NGEFamily मध्ये प्रतिभावंत तृप्ती डिमरीचे स्वागत करणे सन्मानाची गोष्ट आहे. प्रेम SajidNadiadwala."