पुढारी ऑनलाईन डेस्क : रोशन कुटुंब हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कुटुंब आहे. राकेश रोशन ,राजेश रोशन यांनी या चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. त्याचप्रमाणे ऋतिकनेही हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. लवकरच त्याचा डॉक्युमेंटरी-सीरीज 'द रोशन्स' हा नवीन प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अलीकडेच ऋतिक रोशन आणि त्याचे कुटुंब त्याच्या आगामी डॉक्युमेंटरी-सीरीज 'द रोशन्स' च्या मुंबई लाँच इव्हेंटमध्ये पोहोचले होते. या कार्यक्रमात, हृतिक, राकेश रोशन आणि राजेश रोशन यांनी त्यांच्या चित्रपट प्रवासाबद्दल सांगितले. रोशन कुटुंब बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाढीस हातभार लावत आहे.
'द रोशन्स' ही डॉक्युमेंटरी-मालिका १७ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेतून रोशन कुटुंबियांचा प्रवास व आयुष्यातील चढ उतार पाहायला मिळणार आहेत. नुकताच मुंबईत या मालिकेचा ट्रेलर लाँच पार पडला.यामध्ये संपूर्ण रोशन कुटुंब सह्भागी झाले होते.यावेळी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्यांचे विचार मांडले. त्यांचा आजवरचा प्रवासही त्यांनी यावेळी सांगितला. या मालिकेची सह निर्मिती आणि दिग्दर्शन शशी रंजन यांनी केली आहे तर राकेश रोशन त्याचे निर्मातेही आहेत.
ट्रेलर लाँच कार्यक्रमात हृतिक रोशन यानेही त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितले की, त्याच्या मुलांनाही सिनेमा आणि संगीतात रस आहे. त्यांचा एक मुलगा संगीत तयार करतो. तो म्हणाला की ,जर त्याला संधी मिळाली असती तर तो त्याच्या मुलाच्या संगीत रचना त्याच्या आजोबांसोबत (संगीतकार रोशन लाल नागरथ) शेअर केल्या असत्या. 'द रोशन्स' ही मालिका रोशन लाल नागरथ यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वोत्तम क्लासिक गाण्यांनी देखील सुरू होते. हृतिकने या कार्यक्रमात असेही म्हटले की त्याला चित्रपटाची आवड त्याच्या कुटुंबामुळे आहे. राकेश रोशन हे हृतिक रोशनचे वडील आहेत. ते हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेते देखील आहेत. त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून अनेक उत्तम चित्रपट देखील बनवले आहेत. हृतिकचे काका राजेश रोशन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम संगीत दिग्दर्शक देखील आहेत.